शासन आपल्या दारी
नागरिकांनी शासनाच्या विविध योजनेबद्दल माहिती मिळविण्यासाठी तसेच या प्रणालीद्वारे घरपोच सेवा मिळविण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.
8380822333| # | जिल्हा परिषद सेवा | एकूण अर्ज प्राप्त | अर्ज इनप्रोसेस | एकूण होल्ड | एकूण वितरित |
|---|---|---|---|---|---|
| 1 | जन्म नोंद दाखला | 1187 | 39 | 9 | 1139 |
| 2 | मृत्यू नोंद दाखला | 456 | 23 | 3 | 430 |
| 3 | विवाह नोंदणी दाखला | 587 | 35 | 6 | 546 |
| 4 | दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला | 461 | 4 | 10 | 447 |
| 5 | ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला | 356 | 25 | 0 | 331 |
| 6 | नमुना नं ८ चा दाखला | 1186 | 33 | 1 | 1152 |
| 7 | निराधार असले बाबतचा दाखला | 151 | 42 | 0 | 109 |
तुमच्या दारात
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.
वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.
आमच्याशी संपर्क साधानमस्कार, ठाणे डोओरस्टेप पोर्टलवर तुमचे स्वागत आहे, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?